Thursday, 3 July 2014

Two Great Pickles





लिम्बाचे चविष्ट लोणचे 

साहित्त्य: 

२५ लिंबे
पाव किलो आम्बेहळद, पाव किलो हिरव्या मिरच्या, पाव किलो आले
अर्धी वाटी लाल तिखट, अर्धी वाटी हळद
३ वाट्या साखर, ३ वाट्या मीठ
२ चहाचे चमचे खडा हिंग पूड , २ चहाचे चमचे साधा हिंग पूड
४ चमचे मेथीचे कच्चे कूट

कृति : 

प्रथम तेरा लिंबे आठ आठ फोडी करून चिरावी. राहिलेल्या बारा लिम्बांचा रस काढावा.
नंतर मिरच्या, आंबेहळद व आल्याचे आपल्याला आवडतील त्या आकाराचे तुकडे करून घ्यावेत. उदाहरणार्थ लांबट किंवा गोलाकार. नंतर एका पातेल्यात मीठ तिखट, हळद, साखर, हिंग, मेथीची पूड, एकत्र चांग्ल्र मिसळावे. त्यात लिंबाच्या फोडी, आले, मिरच्या, आम्बेहळद, चांगल्या मिसळाव्या व नंतर लिम्बाचा रस वरती ओतून स्वच्छ  बरणीत भरून ठेवावे. थोड्या दिवसांनीचांगले मुरल्यावर वाढायला घ्यावे.


कारल्याचे लोणचे 

साहित्त्य:
अर्धा किलो कारली, अर्धा किलो लोणच्याचे आंबे,
१०० ग्राम लसूण , पाव किलो राईचे तेल,
मीठ दिड पाव, , मेथी अर्धा चमचा,
२ टेबल स्पून राई, अदपाव मिरचीची पूड, हळद पूड एक चमचा


कृति : 
कारल्याच्या चकत्या कराव्या. आंबे सोलून किसून घ्यावे. लसणी च्या पाकळ्या सोलून  घ्याव्या.
मेथी, राई आणि मीठ यांची बारीक पूड दळून घ्यावी. त्यात हळद आणि मिरचीची पूड मिसळावी. त्यात राईचे तेल ओतून कारल्याच्या चकत्या , आंब्याचा कीस आणि लसूण पाकळ्या घालाव्या. हे मिश्रण स्वच्छ कोरड्या बरणीत   भरून तिच्या तोंडावर घट्ट कापड बांधावे. हे लोणचे  उन्हात ठेवल्यावर दहा बारा दिवसात तयार होते.   

No comments:

Post a Comment