बटाटा - मूग डाळ भजी.
५ बटाटे उकडून सोलून घ्यावे आणि चिरून कुस्करावे, एक वाटी मुगाची डाळ भिजवून वाटावी . ३-४ हिरव्या मिरच्या, एक चमचा जिरे, ३ - ४ लसणीच्या पाकळ्या, ३-४ काळे मिरे, १ इंच आले, १ चमचा धणे पूड, वाटून घ्यावे. कुस्करलेल्या बटाट्यात हा वाटलेला मसाला, वाटलेली डाळ, चवी पुरते मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून लहान आकाराची भजी तळावी.
मटारची कचोरी
साहित्त्य:
५०० ग्राम मटार ( ताजा हिरवा वाटाणा)
१ मोठी वाटी बारीक रवा, २ मोठे चमचे तांदळाचे पीठ, २ मोठे चमचे गव्हाचे पीठ
मसाल्यासाठी: २ मोठे चमचे धणे, २ मोठे चमचे जिरे, ४ चमचे काळा मसाला,१०/१५ सुक्या मिरच्या, चहाचा चमचाभर गरम मसाला,
२ मोठे चमचे सुके किसलेले खोबरे, चवीपुरते मीठ
कृति:
सारण: सुके खोबरे थोडेसे भाजून घ्यावे.
मसाला बारीक कुटून घ्यावा. नंतर फोड्णी करून त्यात तो परतून घ्यावा व बाहेर काढून ठेवावा. त्याच तेलात मटार दाणे परतून घ्यावेत. त्यात भाजलेले खोबरे घालावे व कुटलेला मसाला व चवीप्रमाणे मीठ घालून मिश्रण खमंग परतून घ्यावे व थाळीत पसरून ठेवावे.
रवा, तांदळाचे पीठ व गव्हाचे पीठ एकत्र करून मोहन व थोडेसे मीठ घालून घट्ट मळून घ्यावे व त्याच्या मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटाव्या. वरील सारण एका चमचा एकेका पुरीवर ठेऊन मोदका प्रमाणे बंद करून पेढ्या प्रमाणे आकार करून थोडेसे लाटणे फिरवावे व नंतर चुलीवर तवा ठेवून त्याच्यावर कचोरी दोन्ही बाजूंनी गुलाबी डाग पडेपर्यंत भाजून घ्यावी. ती गार झाल्यावर तेलात तळावी.

No comments:
Post a Comment