नलिनी गुप्ते
भरलेली कारली
कांदा बारीक चिरलेला, खोबरं, दाण्याचं कूट, लाल तिखट, गरम मसाला, कोथिम्बीर, मीठ, जरासा गूळ व चिंचेचा दाट कोळ घालून एकत्र सारण करावे.
कारल्यातील आतील बिया आणि गर काढून त्यात हे सारण भरावे. कढईत पुरेशा तेलात जिरे, मोहोरी, हळद व हिंगाची फोडणी करून त्यात भरलेली कारली घालुन अलगद परतावी व झाकण ठेवून मंद विस्तवावर शिजू द्यावीत.
शिजू लागताच बेताचा गूळ घालून पुन्हा अलगद परतून उतरावीत.
No comments:
Post a Comment