A perfectly auspicious day to begin a culinary cruise, when Mumbai heaves a huge sigh of relief, for the delayed monsoon has finally arrived, after the driest June in a century.
And what better way to begin than with a savory bite, when the clouds darken the sky and rains lash against the panes, when the wind plays mysterious tunes through the chinks and the chill sets in in the air, when the crows peep in through the glass, all drenched and bewildered, and when the family looks hopefully at the presiding deity of the kitchen and waits for her grace?
So here's one for the rains!
पालकचे कट्लेट्स
साहित्त्य:
चण्याची डाळ एक वाटी , पालक १ जुडी (अथवा इतर कुठलीही पालेभाजी ), कांदा १, ब्रेडचे २ स्लाईस, चवीप्रमाणे मीठ, हिरव्या मिरच्या, हळद, गरम मसाला, ४ -६ अंडी, तेल
कृति:
चण्याची डाळ भिजत घालावी. पालेभाजी निवडून स्वच्छ धुवून घ्यावी. ब्रेड, भिजलेली डाळ आणि भाजी एकत्र मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. कांदा बारीक चिरून घ्यावा. चवीपुरत्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्या. कांदा जराश्या तेलावर गुलाबी परतून त्यावर चिरलेल्या मिरच्या परतून घ्याव्या. त्यानंतर हे सर्व पदार्थ एकत्र करून त्यात चवीप्रमाणे मीठ, हळद आणि गरम मसाला घालून मिश्रणाचे बेताच्या आकाराचे कट्लेट्स बनवावे. अंडी फेटून घ्यावी आणि त्यात कटलेट्स बुडवून तेलात तळून घ्यावेत.
टोमैटो केचप बरोबर सर्व्ह करावेत.
No comments:
Post a Comment