Monday, 14 July 2014

Ninawe ! The Mysterious Ultimate CKP Sweet.

निनावं 
चारुताई फणसे 

नावात काय आहे?  नावात काहीही  नसलं, तरी निनाव्यात काय आहे हे मात्र फार महत्त्वाचं आहे. निनावं म्हणजे काय हे सी के पी मंडळींना माहीत असेलच. नॉन- सी के पी मंडळीना मात्र सीकेपी मित्र परिवार असल्याखेरीज किंवा त्यांच्याशी रोटी बेटी व्यवहार झाल्याखेरीज निनाव्याचं रहस्य हस्तगत ( की मुखोद्गत म्हणू?) होणं अशक्य आहे. 

कारण आजकाल  अख्या मुंबई - ठाणे - पुणे इत्यादि शहरांनी कोपऱ्यावरच्या दुकानात तुम्हाला पुरणपोळी किंवा मोदक "तयार"  किंवा  "ऑर्डरने" एकवेळ मिळेल,  पण निनाव्याचे मात्र ते दिवस अजून आलेले नाहीत. 

असा हा एक अस्सल पदार्थ कसा करायचा असा जर तुम्हाला प्रश्न असेल तर तो सोडवला आहे चारुताई फणसे ( पूर्वाश्रमीच्या ताम्हाणे) यांनी. 

चारुताई आमच्या विजुकाकींची (कै. विजया गुप्ते)  भाची, बहिणीची मुलगी.  सीकेपी खवय्ये  या पॉप्युलर फेस बुक पेज वर या ब्लॉगच्या पोस्टवर विजूकाकींचा फोटो बघून "अरे ही तर माझी विजूमावशी" अशी उत्स्फूर्त कमेंट त्यांनी केली आणि त्यातून आमचा संवाद झाला. त्यातूनच त्यांनी आपल्या आईकडून ( कै. सुनंदा ताम्हाणे) मिळालेली निनाव्याची रेसिपी  मला पाठवली ती आपल्या सर्वांसाठी पोस्ट करते आहे. 

साहित्त्य: 

१ किलो चणा डाळ, खवा २ वाट्या, ७५० ग्राम साखर, साजूक तूप २५० ग्राम,  २ नारळांचे दूध.  बदाम पिस्ते, जायफळ पूड, वेलची पूड
चण्याच्या डाळीचे रवाळ पीठ तुपात खमंग भाजून घेणे व त्यात खवा परतून घेणे. भाजेल्या बेसनात नारळाचे दूध घालणे. थोड्या वेळाने साखर व किंचित मीठ घालणे व गुठळ्या मोडून तव्यावर पातेले  मंदाग्नीवर ठेवणे. अर्ध्या तासात निनावं तयार होतं. वरून बदाम पिस्ते, जायफळ पूड, वेलची पूड घालणे. एक दिवस ठरू द्यावे. 

No comments:

Post a Comment