Monday, 7 July 2014


तिळाची चटणी 

प्रकार १:

एक छटाक तीळ कढईत खमंग भाजावेत. चहाचा एक चमचा लाल तिखट,
एक चमचा मीठ, अर्धा चमचा गोडे जिरे, लिंबाएवढी चिंच व तेवढाच गूळ व वाटल्यास थोडा लसूण. 
हे सर्व पदार्थ चांगले कुटावे. 


प्रकार २: 

एक छटाक तीळ कढईत खमंग भाजावेत.. त्यात ५ ते ६ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण,  चवीनुसार मीठ ,  एका  लिम्बाचा रस किंवा चिंचेचा कोळ घालून मिश्रण वाटून घ्यावे. 


कैरीची चटणी 

प्रकार १: 

२-३ कैऱ्या सोलून किसाव्या. मोठे दोन कांदे सुद्धा किसून घ्यावे. 
१  मुठभर शेंगदाणे, १ चहाचा चमचा लाल तिखट, दोन चहाचे चमचे मीठ, थोडे खोबरे, अर्धा चमचा गोडे जिरे, लिंबाएवढा गूळ. हे सर्व  पदार्थ एकत्र वाटून घ्यावे. 

प्रकार २: 

२ कैऱ्या सोलून किसाव्या. अर्धी वाटी खोबरे किसून घ्यावे. एक लसणाची गाठ सोलून घावी. ५ - ६ हिरव्या मिरच्या, २ चमचे मीठ, कोठीम्बीर व अर्धी मूठ भाजलेले शेंगदाणे. सर्व  पदार्थ एकत्र वाटून घ्यावे. 


No comments:

Post a Comment