Monday, 7 July 2014

पंचामृत

पंचामृत 

१ मूठभर  शेंगदाणे चांगले भाजून घ्यावेत. 
अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे, १० / १२ हिरव्या मिरच्यांचे तुकडे. 
अर्धी वाटी तीळ  भाजून कूट करावे. 
अर्धा छटाक चिंच कोळून घ्यावी व तितकाच गूळ तीत घोळून घ्यावा. 
 ३ ते ४ चमचे मीठ (चवीनुसार) 
कोथिंबीर
हे सर्व पदार्थ एकत्र करून तेलाची फोडणी करून तीत टाकावे. पाणी घालून उकळू द्यावे व चांगले दाट झाले म्हणजे उतरवावे. 

No comments:

Post a Comment