Sunday, 20 July 2014

Four Soups for the Rainy Season

Choose your soup for the day ....




टोमैटो सूप 

प्रकार १ ला: 

पदार्थ: पाव किलो लालबुंद टोमैटो, १ लहान बीट, १/२ चमचा तिखट, लहानसा आल्याचा तुकडा, १ चमचा तांदळाचे पीठ, १ टेबलस्पून लोणी, ५/६ पुदिन्याची पाने, १ चमचा साखर, मीठ व मिरपूड. 

कृति: टोमैटो, बीट, आले बारीक चिरून ३ कप पाण्यात शिजवून गाळणीवर घोटून गाळून  घ्यावे. त्यात तिखट, मीठ, साखर व तांदळाचे पीठ घालून सारखे करून घ्यावे व उकळून घ्यावे. वाढताना वरून मिरपूड व पुदीन्याची पाने घालावी. 

प्रकार २ रा: टोमैटो बरोबर एका लहान बटाट्याच्या फोडी आणि एका लहान कांद्याच्या फोडी शिजवून घ्याव्या आणि शिजवून गाळणीवर घोटून गाळून घ्याव्या. चवीपुरते मीठ  व मिरपूड घालून सूप उकळावे आणि त्यात उतरताना जरासे दूध घालावे. 

वाटाण्याचे सूप: 

पदार्थ: दीड कप मटारचे दाणे, लहानसा  आल्याचा तुकडा, अर्धे लिंबू, ५/६ पुदिन्याची पाने,  मीठ, मिरपूड, १ चमचा लोणी, १ टेबलस्पून मैदा, मूठभर मटारची साले 

कृति: आले व पुदिन्याची पाने बारीक चिरून घ्यावी. एका पातेल्यात ६ कप पाणी घालून त्यात मटारचे दाणे, पुदीना, आले व मटारची साले घालून  शिजवून गाळणीवर घोटून गाळून  घ्यावीत. दुसऱ्या पातेल्यात लोण्यावर मैदा परतून घ्यावा व गाळलेले सूप त्यात ओतून सारखे करून उकळून घ्यावे. लिंबाचा रस, चवीपुरते मीठ  व मिरपूड घालून वाढावे. 


पालकचे सूप

प्रकार १ ला: पालक शिजवून गाळणीवर घोटून गाळून  घ्यावा. तुपावर कॉर्न फ्लोर जरा परतून  त्यात हळू हळूथोडे दूध घालावे व ते सूप मध्ये घालून चवीपुरते मीठ, जायफळ पूड व मिरपूड घालून गरम गरम वाढावे. 

प्रकार २ रा: पालक बरोबर एका लहान बटाट्याच्या फोडी आणि एका लहान कांद्याच्या फोडी शिजवून घ्याव्या आणि शिजवून गाळणीवर घोटून गाळून घ्याव्या.    चवीपुरते मीठ  व मिरपूड घालून सूप उकलावे आणि त्यात उतरताना जरासे दूध घालावे.  


भाज्यांचे सूप 

साधारण सर्व भाज्या. तांबड्या भोपळ्याच्या फोडी जरा मीठ घालून वेगळ्या उकडून घ्याव्या. बाकी सर्व भाज्या चांगल्या शिजवून घ्याव्या व पाणी गाळून घ्यावे. लोण्यावर म्थोडासा मैदा भाजून त्यात गाळून घेतलेल्या सुपाचे पाणी  घालावे व उकळून घ्यावे. त्यात लाल भोपळ्याच्या फोडी घालाव्या व चवीपुरते मीठ  व मिरपूड घालून वाढावे. 







No comments:

Post a Comment