Saturday, 12 July 2014

Rava Ladu & Ambat Varan - Vijaya Gupte Recipes

 रव्याचे  लाडू 


विजू वहिनी … विजूकाकी…. विजूमामी…… एक गोड आठवण.

साहित्त्य: 

३ वाट्या बारीक रवा
दीड वाटी, जाडं चण्याचं पीठ (मोहन थाळचं),
पाव किलो खवा, १ वाटी दूध, ३ वाट्या साखर,
१ नारळाचा चव
वेलची पूड, बदाम, बेदाणा

रवा व  बेसन एकत्र खरपूस भाजावे. लालसर भाजल्यावर १ वाटी दूध घालून उफाळत ठेवावा. तोड्या वेळाने डिखळ्या मोडून त्यात खवा भाजून घालावा. ३ वाट्या साखर व नारळाचा चव घालून कडक पाक करावार व थेंब टाकून पहावा. थेंब घट्ट बसला कि त्यात रव्याचे  मिश्रण घालून वेलची, बदाम आणि   बेदाणे घालून लाडू वळावे.

आंबट वरण

तुरीची डाळ  शिजताना तीत हिंग, हळद आणि हिरव्या मिरचीचे तुकडे थोडेसे घालावे. शिजल्यावर धणे- जिरे पूड, चिंच - गूळ व लाल तिखट घालून उकळवावी. वरून फोडणीला राई, मेथी, कढीपत्ता, हिंग व लाल सुक्या मिरच्या व मीठ घालून उकळी आणावी.


No comments:

Post a Comment