Monday, 14 July 2014

Shell Fish Curry - One more Vijaya Gupte Recipe

शिम्पल्याचे कालवण

(आणखी एक विजू वहिनी रेसिपी )



शिंपल्या आधी स्वच्छ धुवून घ्याव्या. थोडा वेळ फ्रीझर मध्ये ठेवाव्या म्हणजे त्या उघडतील. मग एकेक शिपी काढून टाकावी आणि राहिलेल्याना दही लावून ठेवून द्याव्या.  थोडी तिरफळे पाण्यात भिजवत ठेवावी. 

वाटणात: ओले खोबरे, सुक्या लाल मिरच्या, अंदाजे गरम मसाला म्हणजे धणे, जायपत्री, लवंग, मिरी, दालचिनी, थोडे काजू हे सर्व बारीक वाटून घ्यावे  व दही  लावलेल्या शिंपल्यांना लावून ठेवावे.भांड्यात गरम तूप करून त्याततिरफळे ठेचून फोडणीला टाकावी. त्यानंतर त्यात भरपूर कांदा छानसा परतून  त्यात  वाटण लावलेल्या शिंपल्या घालून चांगल्या परताव्या व हवे तेवढे पाणी घालून चवीपुरते मीठ  व तिखट घालून उकळाव्या. 

No comments:

Post a Comment