तुरीच्या दाण्याच्या कचोऱ्या
१ किलो तुरीच्या शेंगांचे दाणे वाफवून घ्यावेत.
मैदा, पाव किलो चण्याचे पीठ,
बेताच्या हिरव्या मिरच्या, आलं, ओला लसूण, कोथिंबीर यांचे वाटण
ओवा, तीळ, हिंग
लिंबू, साखर.
गोड्या तेलात हिंग, ओवा, तिळाची फोडणी करून वाफवलेले दाणे त्यात कुस्करून घालावे व त्यात वाटण घालून चांगले परतावे. चवीप्रमाणे मीठ, लिंबू आणि साखर घालून परतावे. मैद्यात चण्याचे पीठ एकत्र करून मोहन घालुन मळावे आणि लहान पुऱ्या लाटून कचोऱ्या वळाव्या आणि तळून घ्याव्या.
तांदळाची बोरं
तांदळाच्या पिठात तीळ, जिरे, गूळ, जरासं तिखट, चवीपुरतं मीठ, सुकं खोबरं घालून पीठ मळून लहान लहान बोराएवढे गोळे करून तेलात मंद तळावे.

No comments:
Post a Comment