खानदेशी चटणी
१२ हिरव्या मिरच्या मधे चीर पाडून कढईत नुसत्या भाजून घेणे.
चांगल्या पोळ्तील इतपत. एक वाटी भाजलेले शेंगदाणे.
मूठभर तीळ भाजून घेणे. चमचाभर भाजलेलं जिरं.
मूठभर कडीपत्ता भाजून घेणे. चवीपुरतं मीठ भाजून घेणे.
एकेक पदार्थ जाडसर मिक्सरमध्ये दळणे.
सगळे पदार्थ एकत्र करुन हाताने कालवणे.
आणि मग मिश्रणाला हिंग राईची खमंग फोडणी देणे.
सुक्या खोबऱ्याची चटणी
सुकं खोबरं २ वाट्या खरपूस भाजून घेणे. २ टेबलस्पून लाल तिखट जरासं तव्यावर भाजून घेणे. (तेलात नाही). मूठभर कडीपत्ता भरपूर भाजून घेणे. १२ लसणीच्या पाकळ्या सोलून भाजून घेणे. चार बारके चमचे तीळ भाजून घेणे. चवीपुरतं मीठही भाजून घेणे. (वरील सर्व पदार्थ वेगवेगळे भाजून घेणे.) भाजलेले सर्व पदार्थ
एकत्र वाटून घेणे.
No comments:
Post a Comment