Sunday, 6 July 2014

A Sweet Moment

गुळपापडीच्या वड्या

साहित्त्य:
कणीक २ वाट्या 
तूप २ वाट्या 
गूळ १ वाटी 
सुकं खोबरं किसलेलं १ वाटी 
खसखस  
वाटल्यास मूठभर पोहे भाजून 

कृति :
सुकं खोबरं आधी थोडं भाजून घ्यावं
कणीक भाजण्यास घ्यावी व तीत  हळुहळू तूप सोडावे. 
मग कणकेत सुकं खोबरं मिसळून मिश्रण खरपूस भाजून घ्यावं. 
भांडं चुलीवरून खाली उतरवून त्यात गूळ घालून मिश्रण चांगलं एकजीव ढवळून घ्यावं. 
५ मिनिटांनी व वरून खसखस घालून वड्या १५ मिनिटांनी कापाव्या. 





No comments:

Post a Comment