फ्राईड चिकन
एक कोंबडी उकडून छोटे छोटे तुकडे करावे.
मैद्या मध्ये थोडे मीठ घालून त्यात अंडे घुसळून बेताचे दूध किंवा पाणी घालून पुरेसे batter तयार करावे.
एक डाव तेलावर लसणीचे बारीक तुकडे लाल न होईपर्यंत परतावे आणि ४ ते ५ टोमैटोचे बारीक तुकडे घालून झाकणी द्यावी. टोमैटो शिजले की चांगले घोटावे. चवीनुसार मीठ आणि साखर (एका कोंबडीला साधारण दोन चमचे) आणि चिली सॉस घालून उकळावे .
कोंबडीचे तुकडे ब्याटर मध्ये घालून कढईत तळून घ्यावेत. वाढताना तळलेले तुकडे सॉस मध्ये घालून वाढावे.
कच्च्या केळ्याचे दहीवडे
१ डझन कच्ची केळी
२ टेबल स्पून चण्याचे पीठ
दही,
मीठ , तेल लाल तिखट , जिऱ्याची पूड
दही नीत घुसळून घ्यावे.
केळी सोलून कुकर मध्ये उकडून घ्यावीत. मग ती वाटून त्यात चवीपुरते मीठ घालून त्याच्या बेताच्या आकाराच्या गोळ्या कराव्यात.
चण्याचे पीठ पातळ भिजवावे व त्यात केळ्याच्या चपट्या गोळ्या बुडवून तळून घ्याव्यात. सर्व वडे तळून झाल्यावर वाढायच्या आधी दहा मिनिटे दह्यात घालावेत आणि त्यावर तिखट, मीठ, आणि जिऱ्याची पूड घालून खाण्यास द्यावे.

No comments:
Post a Comment