Friday, 18 July 2014

Kheema Cutlets





खिम्याचे कटलेट्स 

१ रत्तल खिमा स्वच्छ चाळणीवर धुऊन घ्यावा. त्यात १ मूठभर चण्य़ाची डाळ,  आल्याचे तुकडे, लसूण आणि मीठ घालून खिमा शिजवून घ्यावा व पाणी आटू द्यावे. त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या, धणे - जिरे पूड, गरम मसाला आणि  कोथिंबीर घालून मिश्रण वाटून घ्यावे. मग त्याच्या टिक्क्या बनवून अंड्यात बुडवून तळाव्या व पुदिन्याच्या पंजाबी चट्णी बरोबर खाण्यास द्याव्या. 

पंजाबी चटणी 

कांदा, पुदीना, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, खटाई, मीठ, अनारदाना एकत्र करून वाटावे. 

No comments:

Post a Comment