Thursday, 10 July 2014

Chicken Curry

कोंबडी रस्सा 

साहित्त्य:

१ किलो साफ केलेली कोंबडी 
१ इंच आले, १० - १५ लसूण पाकळ्या, 
 १ मोठे लिंबू, ४ मोठे कांदे, 
१ चमचा हळद, १ चमचा तिखट, 
२ चमचे किसलेले सुके खोबरे, नारळाच्या  अर्ध्या  वाटीचे खवलेले खोबरे, 
 २ चमचे धणे, १ चमचा बडीशेप, १ चमचा जिरे, २ चमचे खसखस, २ मसाल्याचे वेलदोडे, 
३/४ दालचिनीचे तुकडे, ८/१० काळी मिरी , 
१ लहानसा जायफळाचा तुकडा,
तूप 

कृति :
कोंबडीचे तुकडे करून साफ करून स्वच्छ धुऊन घ्यावेत. 
आले लसूण वाटून घ्यावे. धुतलेल्या तुकड्यांना वाटलेले आले लसूण, हळद, तिखट, मीठ  आणि लिंबू चोळून मुरू द्यावे.

१ कांदा बारीक चिरून घ्यावा व पातेल्यात  तुपावर गुलाबी रंग येईस्तोवर परतून घ्यावा आणि मग त्यात कोंबडीचे तुकडे घालून परतून बेताचे  गरम पाणी घालून शिजवत ठेवावे. 

उरलेले तीन कांदे उभे चिरून तुपावर परतून घ्यावे. इतर मसल्याचे  पदार्थ व सुके   खोबरे तुपावर जरा जरा भाजून एकत्र बारीक वाटून घ्यावे. ओल्या नारळाचा रस काढावा. कोंबडी शिजत आल्यावर वाटलेला गरम मसाला आणि नारळाचे दूध घालुन उकळी आणावी. वरून चवी प्रमाणे लाल तिखट व मीठ घालावे. आवडत असल्यास टोमैटो आणि बटाटेही घालायला हरकत नाही. 

No comments:

Post a Comment