कोबी कोफ्ता करी
कोफ्त्यासाठी: कोबी २५० ग्राम, बेसन ५० ग्राम, थोडी जीरे पूड, आमचूर
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, कोथिम्बीर, मीठ
करी साठी: २ कांदे कापलेले, आलं, २ टमाटर,हळद, धणे पावडर, १ चमचा गरम मसाला, कोथिंबिर, मीठ.
कृती:
कोफ्ते: कोबी बारीक चिरून त्यात बेसन, मसाले, मिरची, कोथिंबीर व चवीपुरते मीठ मिसळून मळावे व लहान लहान गोळे करून तेलात तळून घ्यावे.
करी: दुसऱ्या कढईत तुपात कांदा, टोमैटो परतून घेऊन त्यात आलं, गरम मसाला, हळद, धणे पावडर घालून चांगले परतून घ्यावे व पाणी घालून मीठ व कोथिम्बीर घालून उकळी आणून त्यात कोफ्ते सोडावे. पाच मिनिटे उकळीआणावी.
मटार - बटाटा, कच्ची केळी-बटाटा, पनीर इत्यादीचे कोफ्तेही करता येतात.
चित्रान्ना
मोकळा सडसडीत भात, (शिळा चालेल). त्या मानाने हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा बारीक मोहोरी वाटून लावावी. चवीला लिंबू साखर लावून ओला नारळ खरवडून घालावा व मोहोरी, हिंग, उडदाची डाळ व सुक्या मिरच्यांची तेलाची खमंग फोडणी द्यावी. त्यात काजू किंवा शेंगदाणेही छान लागतात. प्रवासात न्यायला हरकत नाही.