Friday, 1 August 2014

"Karlavni" & " Tondli" Sambar : Two Unusual recipes from Charu Phanse

चारू फणसे 
शंकरपाळीत शंकर नसतो. पण म्हणून काय तोंडल्याच्या सांबारात तोंडली  …….? 

चारुताईंची आई म्हणजे कै. सुनंदा ताम्हाणे, प्रेमाचं नाव बाईजी. पट्टीच्या सुगरण होत्या. 

शेंडेफळ असलेल्या चारुताईनी आईच्या थोड्याशाच रेसिपीज तिला विचारून उतरवून घेतल्या होत्या.त्यातील निनावं आधीच दिलंय. आज त्यांनी शेअर केल्या आहेत दोन वेगळ्याच रेसिपीज.





"कारलावणी" 

अर्थात,

कारल्याची आमटी !


पदार्थ: 

एक कारले, एक कांदा, पाव वाटी सुके खोबरे, ६. - ७ लसूण पाकळ्या,

गूळ, चिंचेचा कोळ, धणे जिरे पूड दोन चमचे. 


कृति: 

कारले, खोबरे आणि एक कांदा थेट विस्तवावर भाजून घ्यावे. नंतर 

थोडे तासून मिक्सर मध्ये लसूण घालून वाटून घ्यावे. फोडणी करून

त्यात हे वाटलेले कारले घालणे आणि हळद, धणे जिरे पूड, चवीपुरते

तिखट, मीठ , गूळ आणि चिंचेचा कोळ घालून उकळी आणणे. चव

छान आंबट गोड लागते. सूप सारखे पिता येते.




"तोंडल्याचे" सांबार:


पदार्थ: 

चण्याचे पीठ, हळद, तिखट, मीठ, ओवा, सुके किंवा ओले खोबरे,

आले, लसूण, कांदे, कोथिंबीर. 


कृति: 

कांदे-खोबऱ्याचा तळला मसाला करणे.

त्यात अर्धा इंच दालचिनी, दोन लवंगा, एक वेलची घालून वाटून घेणे. 

हिरव्या वाटणात ६ - ७ पाकळ्या लसूण, थोडे आले, ओले खोबरे, अर्धी 

वाटी कोथिम्बीर घालून वाटणे. 


"तोंडली" करण्यासाठी चण्याचे पीठ दोन वाट्या घेऊन त्यात हळद, 

तिखट, मीठ आणि थोडा ओवा घालून मळणे. या मळलेल्या पिठाची 

"तोंडली" बनवून घेणे. (हाताने तोंड्ल्याच्या आकाराच्या मुटकुळ्या

वळणे).

एका पातेल्यात पाणी उकळ्यायला ठेवणे आणि जरा उकळी येऊ 

लागताच त्यात वळलेली तोंडली सोडणे. १५ - २० मिनिटे उकळणे.

चांगली शिजली पाहिजेत. नंतर ती पाण्यातून काढून गार झाल्यावर 

त्यांचे उभे काप काढणे. तेलाचीफोडणी करून त्यात आधी हिरवे वाटण

आणि मग तळलेले वाटण घालणे आणि परतल्यावर पाणीघालून 

उकळणे. त्यात " तोंड्ल्या" चे तुकडे घालणे आणि हळद, तिखट,

मीठ, गूळ, धणे-जिरे पूड, थोडा गरम मसाला आणि २-३ आमसुले 

घालून थोड्या वेळाने विस्तव बंद करणे.



No comments:

Post a Comment